महाराष्ट्र
Trending
महाराष्ट्रातील वसईत मसाज पार्लरवर छापा, 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका ! सेक्स रॅकेटमध्ये सहभागाच्या आरोपावरून दोघे अटकेत !!

पालघर, ६ ऑक्टोबर – महाराष्ट्रातील वसई परिसरातील नालासोपारा येथील मसाज पार्लरवर छापा टाकून सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांनी पत्रकारांना सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे पार्लरवर छापा टाकण्यात आला आणि त्यादरम्यान दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.
मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.