
JALGAON | – इंदोर – हैदराबाद हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जातो. या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. प्रशासनाने योग्य तो मोबदला न दिल्याने, आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे आज शेतकरी आणि मुक्ताईनगर चे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधी आंदोलन आहेत, यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधीसाठी आक्रमक झाले, त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या कामात जात आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु त्याचा उपयोग न झाल्याने आज मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते.
यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच धावपळ करून, हे जलसमाधी आंदोलन रोखले. मात्र या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या तब्येती देखील बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.






























