महाराष्ट्र
Trending

29 ऑगस्टला मुंबई वरुन आरक्षण घेऊन येणार किंवा मयत येणार!

JALNA |  – आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. या प्रसंगी त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या गोरगरीब मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मात्र त्यांनी कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या संख्येने समाजाला सोबत घेऊन, मी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. आणि समाजामध्ये सुद्धा मोठा जोश या आंदोलनादरम्यान निर्माण झाला असून, मुंगी सारखा समाज हा मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना होणार आहे. आणि आता मी मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार किंवा मयत येणार, असा इशारा सुद्धा याप्रसंगी जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हटले आहे की, सरकारने फक्त मराठा समाज बांधवांची फसवणूक सुरू केली आहे. मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना या सरकारने बंद पाडले आहे. त्यामुळे समाजाचे प्रचंड हाल होत आहेत.

आणि हे हाल मला बघावत नाही. त्यामुळे मी आता जगेन की, मरेन हा प्रश्न सध्या माझ्यासमोर नसून, माझ्यासमोर फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा एकच ध्यास आहे. आणि तो मी या 29 ऑगस्ट रोजी पूर्ण करणार असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!