इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार समिती स्थापन करणार !
आठवीपर्यंतच्या या परीक्षांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करणार नाही

पुणे, 7 ऑक्टोबर – महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सांगितले की, इयत्ता 3 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार एक समिती स्थापन करणार आहे.
राज्य सरकारने 10 वर्षांपूर्वी ‘युनिट टेस्ट’ आणि सेशन एंड परीक्षा बंद केल्या होत्या.
राज्य सरकारचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मानसशास्त्रज्ञांसह तज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल, जी इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल.
तथापि, आठवीपर्यंतच्या या परीक्षांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण घोषित केले जावे, अशी आमची इच्छा नाही.”
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या उपक्रमाचा राज्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.