
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ – चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) पोलिसांना यश आले. १) रितवान कच्चा काळे रा. पांढरओहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, २) राजू भानुदास इंदापूरे रा. पांढरओहळ ता. गंगापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस ठाणे वैजापूर येथे दिनांक २२/१०/२०२३ रोजी फिर्यादी बबाबाई एकनाथ डांगे वय ६५ वर्ष, रा. शिवराई शिवार ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली की, पती एकनाथ धोंडीबा डांगे यांच्या रहावयास असून माझा मुलगा सयाजी हा शिवराई गावात मळयात त्याचे कुटूंबासह राहतो. तसेच मुलगा विजय हा शिवराई शेत गट नं. २१२ मध्ये त्याच्या कुटूंबासह वास्तव्यास आहे.
दिनांक २१/१०/२०२३ रोजी मी व माझे पती एकनाथ डांगे असे आमचे घरी असतांना रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास मला दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला परंतु आम्ही दरवाजा उघडला नाही थोडया वेळाने अज्ञात दोन जणांनी दरवाजा जोरात ढकलून आमच्या घरात घुसले व त्यांनी आम्हास चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देवून मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच माझ्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ७१,५००/- रुपयांचा मुददेमाल बळजबरीने चोरून नेला म्हणून गुन्हा दाखल होता.
नमूद गुन्हयांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड यांचे व अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा सतिष वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास नमूद गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद गुन्हयातील आरोपीतांची गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीवरून बातमी मिळाली की १) रितवान कच्चा काळे रा. पांढरओहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर त्याचे साथीदारासह केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीवरून पथकाने पांढरओहळ येथे जावून रितवान कच्चा काळे याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार २) राजू भानुदास इंदापूरे रा. पांढरओहळ ता. गंगापूर याचेसह केला आहे. यावरून त्याचा साथीदार यांचा त्यांचे राहते पत्यावर व परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला.
दोघांना नमूद गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली. आरोपी क्रमांक १ ते २ यांने नमूद गुन्हयात चोरी केलेला मोबाईल हॅन्डसेट सविस्तर जप्ती पंचनामा करून गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. नमूद दोन्ही आरोपीतांना पोस्टे वैजापूर यांचे ताब्यात पुढील तपासकामी हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहा.पो.निरीक्षक, पवन इंगळे, पोलीस अंमलदार रवि लोखंडे, विठठल डोके, वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक निलेश कुडे यांनी केली आहे.