
- “मुसळधार पावसामुळे प्लास्टरमध्ये पाणी शिरले असावे, त्यामुळे ते पडले. पुरातत्व विभाग लवकरच संवर्धनाचे काम सुरू करणार आहे."
औरंगाबाद, 21 नोव्हेंबर – महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील 17व्या शतकातील ‘बीबी का मकबरा’च्या बाहेरील प्लास्टरचा भाग कोसळला. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.
शनिवारी झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
बीबी का मकबरा ताजमहालासारखे दिसते. मुघल सम्राट औरंगजेबाची पहिली पत्नी दिलरास बानो उर्फ राबिया-उद-दुरानीचा मकबरा आहे. याला दख्खनचा ताज असेही म्हणतात.
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मकबर्याच्या मुख्य घुमटाजवळील मिनारच्या चुना प्लास्टरचा एक छोटासा भाग खाली पडला.
ते म्हणाले, “मुसळधार पावसामुळे प्लास्टरमध्ये पाणी शिरले असावे, त्यामुळे ते पडले. आम्ही लवकरच संवर्धनाचे काम सुरू करू.”