जळू द्या समदं गाव… शासनाला लाकडं पुरवायला लावा, मस्साजोग ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रियाने महाराष्ट्र हादरला ! दहा दिवसांत आरोपी पकडा नाहीतर वाल्मिक कराडला मुख्यमंत्री करा !!
वाल्मिक कराडला मुख्यमंत्री करा आणि येथील पालकत्व द्या संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया...?

छत्रपती संभाजीनगर – बरं साहेब, दहा दिवस का होईना.. दहा दिवसांत आरोपी जर नाही पकडले तर वाल्मिक कराडला सोडा अन् मस्साजोगच पालकत्व देवून शासनाला लाकडं पुरवायला लावा.. जळू द्या सगळं गाव. वाल्मिक कराडला मुख्यमंत्री करा जगूनपण काही उपयोग नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. संतोष देशमुख यांची हत्या होऊन २३ दिवस उलटले, मात्र तीन आरोपी अजूनही फरार आहेत. फरार आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आंदोलनस्थळास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्यासमोर मांडल्या. बरं साहेब, दहा दिवस का होईना.. दहा दिवसांत आरोपी जर नाही पकडले तर वाल्मिक कराडला सोडा अन् मस्साजोगच पालकत्व देवून शासनाला लाकडं पुरवायला लावा.. जळू द्या सगळं गाव. वाल्मिक कराडला मुख्यमंत्री करा जगूनपण काही उपयोग नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील उर्वरित सर्व आरोपींना दहा दिवसांत अटक करू. सर्व प्रकरण सीआयडी हाताळत आहे. आमचे पोलिसही त्यांना मदत करत आहे. तुम्ही धीर धरा पोलिस प्रशासन गतीने काम करत आहे, असे यावेळी नवनीत कॉवत यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तीन आरोपी अजून फरार आहेत. आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी त्यांची नावे आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हे या खून प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड अटकेत असून त्यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.