
MUMBAI | – स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरात मधून अटक केली आहे. तबरेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, गुजरात मध्ये विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
रोपी तबरेजची मावशी नूरजहाँ मुनाफ खान या विक्रोळी पार्कसाईटला राहतात. काही वर्षांपूर्वी तबरेजचा सांभाळ त्याच्या या मावशीने केला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तबरेजला सुधारण्याच्या त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याच्या याच मावशीने खूप प्रयत्न केले होते. मात्र, तो सुधारातच नसल्याने त्याला त्यांनी दूर केले होते.
मात्र, या काळात तो अट्टल गुन्हेगार बनला होता. गुजरात मध्ये त्याने अनेक गंभीर गुन्हे केले होते. मात्र, अचानक दि. ७ रोजी तबरेज हा त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क आणि हातात ग्लोज घालून घरात त्याने प्रवेश केला. या वेळी घरात एकट्या असलेल्या नूरजहाँ यांच्या अंगावरील दागिने तो हिसकावू लागला असता नूरजहाँ यांनी त्याला ओळखले. तुला हवे ते घे पण मला मारू नको असे त्या त्याला सांगत असताना तबरेजने त्यांच्यावर धार धार शस्त्राने वार केले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात ढकलून तिथून पळ काढला आणि ट्रेनने गुजरात गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पार्कसाईट
पोलिसांनी चार पथके नेमून २५० सीसीटीव्ही च्या सहाय्याने गुजरात मधून या आरोपीला अटक केली आहे.






























