महाराष्ट्र
Trending
शेयर मार्केट मध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका इसमाला तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांना घातला गंडा

NAVI MUMBAI | – नवी मुंबईतील एका इसमाची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केलेय. खाजगी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या 60 वर्षीय इसमाशी व्हाट्सअप द्वारे संपर्क साधत एका महिलेने शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाला बळी पडत सदर इसमाने विविध बँक खात्यावर तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास पैसे निघत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सदर इसमाच्या लक्षात आले. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.