सिल्लोडच्या स्थानिक निवडणुकांसाठी भाजपसोबत युती करण्यास अनुकूल नाही : मंत्री अब्दुल सत्तार
आपली भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली असून, शिंदे याबाबत निर्णय घेतील

औरंगाबाद (महाराष्ट्र), 30 सप्टेंबर – महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी सांगितले की मी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत युती करण्याच्या बाजूने नाही.
सत्तार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचा भाग आहेत आणि राज्याच्या युती सरकारमध्ये मंत्री आहेत.
आपली भूमिका शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली असून, शिंदे याबाबत निर्णय घेतील, असे सत्तार यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, “मी फक्त माझ्या सिल्लोड मतदारसंघाबाबत बोललो आहे. आमच्यात कुठलीही भांडणे होऊ नयेत. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (भाजपसोबत) मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे.”
सत्तार म्हणाले, “मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. ते अंतिम निर्णय घेतील.”