कर्णपुरा यात्रा : औरंगाबाद शहर व आजुबाजूच्या परिसरातील काही वाहतूक व्यवस्थेत बदल ! जाणून घ्या पर्यायी मार्ग !!

औरंगाबाद, दि. 23 – संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवाणी देविच्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद करण्यात आले असले तरी त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या काळात वाहनधारकांनी या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन छावणी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन कामे यांनी केले.
दिनांक २६/०९/२०२२ पासून नवरात्र उत्सव सुरु होत आहे. कर्णपुरा येथे श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर असून, नवरात्रोत्सव दरम्यान देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटे पासून औरंगाबाद शहर व आजुबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
तसेच तेथील कर्णपुरा मैदानात नवरात्रातील ०९ दिवस यात्रा भरते. नवरात्र उत्सवामध्ये येणा-या भाविकात प्रामुख्याने महिला, लहान मुले व वृध्द व्यक्ती सहभागी होत असतात. यात्रा व देवीच्या दर्शनासाठी भाविक पायी व आप-आपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येतात. तसेच विजयादशमीचे दिवशी कर्णपुरा येथील बालाजी भगवान यांची रथ यात्रा मिरवणुक सालाबादाप्रमाणे निघत असते.
त्यामुळे सदर परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाण वर्दळ निर्माण होऊन, नागरिकांच्या सुरक्षितेता, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून नवरात्रोत्सव दरम्यान सदर परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीचे नियमन करण्यात येत आहे.
नवरानोत्सव दरम्यान दिनांक २६/०९/२०२२ रोजी ००.०१ वाजे पासून ते ०५/१०/२०२२ रोजी २४.०० वाजेपर्वत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्यात येत आहे.
१) लोखंडी पूल ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
२) कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
३) महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते पंचवटी चौक उड्डाणपुला खालील जाणारा व येणारा मार्ग.
४) रेल्वेस्टेशन कडून महावीर चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग
१. रेल्वे स्टेशनकडून- मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी व जाणारी वाहने महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) उड्डाणपुलाचा वापर करतील.
२. नाशिक धुळे कडून येणारी व जालना बीडकडे जाणारी वाहने ही शरणापूर फाटा- साजापूर फाटा- ए.एस. क्लब- लिंक रोड- महानुभव आश्रम चौक-बीड बायपास रोड या मार्गाने जातील.
३. नाशिक-धुळे कडून येणारी व पैठण कडे जाणारी वाहने ही शरणापूर फाटा, साजापूर फाटा, ए. एस. क्लब लिंक रोड या मार्गाने किंवा धुळे सोलापूर हायवेने जातील.
४. पुणे. नगरकडून येणारी व जालना बीड कडे जाणारी वाहने ही ए.एस. क्लब लिंक रोड-महानुभव आश्रम चौक या मार्गाने जातील.
५. जालना- बीड कडून येणारी व नगर-धुळे-नाशिक कडे जाणारी वाहने ही बीड बायपास रोड-महानुभव आश्रम चौक-लिंक रोड.ए.एस. क्लब मार्गे जातील.
६. कोकणवाडी चौककडून पंचवटी चौकाकडे जाणारी वाहने रेल्वेस्टेशन किंवा क्रांतीचौक मार्गे जातील.
बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. सदर अधिसूचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. अधिसुचनाचा भंग करणारी व्यक्ती म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.