धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नाशिकच्या पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

- खोलीत पोलीस निरीक्षक प्रवीण विश्वनाथ कदम यांनी लिहिलेले एक पत्र सापडले, ज्यामध्ये त्यांनी माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले होते.
मुंबई, 16 नोव्हेंबर – महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, मृत प्रवीण विश्वनाथ कदम यांनी घटनेपूर्वी मंगळवारी एक पत्र लिहले होते ज्यात त्यांनी आपल्या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “21 नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभ होणार आहे. कदम यांनी मंगळवारी दुपारी कार्यक्रमाच्या तयारीत सहभाग घेतला. पुण्याहून आल्यानंतर 2019 पासून त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले असता त्यांनी दरवाजा ठोठावला. आतून आवाज न आल्याने त्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला असता ते लटकलेल्या अवस्थेत दिसले.
त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले.
एका अधिकाऱ्याने सांगितले, त्यांच्या खोलीत कदम यांनी लिहिलेले एक पत्र सापडले, ज्यामध्ये त्यांनी माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले होते.
पोलिसांनी सांगितले, नाशिकमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, या घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.