राष्ट्रीय
Trending
34 पेपरलेस न्यायालयांचे उद्घाटन, न्यायिक अधिकारी पेपरलेस न्यायालयांसाठी स्वेच्छेने आले पुढे !!

कटक (ओरिसा), 17 सप्टेंबर – भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) उदय उमेश ललित यांनी शनिवारी ओडिशातील 30 जिल्ह्यांमध्ये 34 पेपरलेस न्यायालयांचे उद्घाटन केले.
ओरिसा उच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ येथील ओडिशा न्यायिक अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात पेपरलेस न्यायालयांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायपालिकेच्या कामकाजासाठी तांत्रिक प्रगती आवश्यक बनली आहे. पेपरलेस कोर्टाचा सकारात्मक परिणामही त्यांनी अधोरेखित केला.
ओरिसातील न्यायिक अधिकारी पेपरलेस न्यायालयांसाठी स्वेच्छेने पुढे आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. उच्च न्यायालयाच्या ई-उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.