महाराष्ट्र
Trending

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर – राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक गडकिल्ल्यांचे व पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात . या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी व पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष ( सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारकडे केली.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र
विषयक स्थळे व अवशेष ( सुधारणा) विधेयक – २०२४ आणून शासनाने अत्यंत स्तुत्य काम केले आहे. सदरील विधेयक अत्यंत चांगले असले तरीही शिवकालीन व यादवकालीन अनेक गड किल्ल्यांवर मद्य सेवन व जुगार खेळले जातात. तरुण पिढीला या गडकिल्ल्यांचे पावित्र्य माहित नसते. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे, यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!