महाराष्ट्र
Trending

जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपीकाचे घर फोडले, शेजारचे घरही फोडले ! दोन्ही घरांतून ३ लाखांचा ऐवज लंपास !!

छत्रपती संभाजीनगर- गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपीकाचे घर फोडले. तसेच त्याच्या शेजारचेही घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. शांतीबन, हरीराम नगर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे ही घरफोडी करून दोन घरांतून एकूण रुपये 3,19,350/-रुपये किंमतीचा ऐवज चोरांनी लंपास केला.

राजेंद्र सीताराम सानप, वय-52वर्षे, व्यवसाय- नोकरी (जिल्हा न्यायालय,वरिष्ट लिपीक) रा. शांतीबन, हरिराम नगर, रो हाऊस नं.295, नंदीनी हॉटेलच्या पाठीमागे, बीडबायपास गणपती मंदीरासमोर, छत्रपती संभाजीनगर यांनी पुंडलिक नगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे गावी गेले असतांना दि. 13/12/2024 रोजी सकाळी 09.30 वा ते दि. 16/12/2024 रोजीचे सकाळी 09.30 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून कपाटातील मौल्यवान सोन्याचांदीचे एकूण किं. 1,41,850/-रुपयांच्या वस्तु चोरुन नेल्या. तसेच सानप यांच्या घराच्या मागे राहणारे प्रशांत मुले यांनी देखील पोलिस स्टेशनला हजर राहून त्यांनी सांगतले की, त्यांच्या घरातील लॉक तोडुन कपाटातील मौल्यवान सोन्याचांदीचे एकूण 1,77,500/-रुपये, किंमतीचा ऐवज चोरुन नेला. तसेच सानप व मुळे यांचे एकुण रुपये 3,19,350/-रुपये किंमतीचा ऐवज चोरांनी घरफोडी करुन चोरुन नेला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!