प्रेम संबंधात हडपसर पत्नीचा पेस्ट्री साइडचे इंजेक्शन देऊन खून, पूजा बागुल खून प्रकरणाला वेगळे वळण जादूटोणा करणाऱ्याला ५० हजार दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर

DHULE | पूजा बागुल खून प्रकरणाला वेगळे वळण
ANC – धुळे शहरातील रहिवासी असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बाळू बागुल नामक मिल्ट्री मध्ये क्लार्क या पदावर कार्यरत असणाऱ्या नराधमाने गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी पूजा बागुल हिला पेस्ट्रीसाइड चे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. कपिल बागुल याचे प्रज्ञा कार्डीले नामक महिला सोबत असलेल्या प्रेम संबंधांच्या आड त्याची पत्नी पूजा येत असल्याच्या कारणातून त्याने तिला आपल्या साथीदारांच्या मदतीने पेस्ट्रीसाइड चे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासातून आरोपी पती कपिल बागुल याची जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे नामक व्यक्तीच्या मदतीने त्याने हा खून केल्याचे समोर आले असून, कपिल बागुल याची प्रेयसी असणाऱ्या प्रज्ञा हिने जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे याला तब्बल 50 हजार रुपये दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात धुळे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दौलत जाधव, 19 वर्षीय जयेश अनिल जगताप आणि दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचे समोर आले असून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे






























