महाराष्ट्र
Trending

मुलीची पसंती, साखरपुडा, लग्नाची तारीख ठरवून नवरा मुलाचे कपडे घेण्यापर्यंत 9 लाख खर्च झाला… ऐनवेळी 5 लाख रोख व 7 तोळे सोने हुंडा मागितला अन् ठरलेले लग्न मोडले !

छत्रपती संभाजीनगर -: मुलीची पसंती, साखरपुडा, लग्नाची तारीख ठरवून नवरा मुलाचे कपडे घेण्यापर्यंत 9 लाख खर्च झाला अन् ऐनवेळी 5 लाख रोख व 7 तोळे सोने हुंडा मागितला अन् ठरलेले लग्न मोडल्याची फिर्याद सातारो पोलिस स्टेशनमध्ये दाखळ झाली आहे. याप्रकरणी मुलासह त्याच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला आहे.

दिनांक 10 जुन 2024 ते दिनांक 08/10/2024 दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे फिर्यादी यांच्या मुलीस नवरी म्हणून पसंत करून साखरपुडा करून घेतला. तसेच लग्नाची तारीख 11/08/2024 रोजी सायंकाळ ठरवले. त्यासाठी फिर्यादीने सर्व तयारी केलेली असताना अचानक 5,000,00 (पाच लाख रुपये) रोख व सात तोळे सोने हुंडयाची मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार दिला असता त्यांनी ठरलेले लग्न मोडून, फिर्यादीच्या मुलीची पसंती पासून ते लग्नाची तारीख ठरवून नवरा मुलाचे कपडे घेण्यापर्यंत फिर्यादीचा व फिर्यादीच्या कुटूंबीयांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने साखरपुडाचे 7,18,590 रुपये व लग्नाच्या तयारीसाठी खर्च केलेले एकूण 1,87,000/- रुपये अशी फिर्यादीचे 9,05,590/- ( नऊ लाख पाच हजार पाचशे नव्वद) रुपयाची फसवणुक केली व फिर्यादीच्या मुलीचे लग्न जमलेले असतांना ते मोडल्याने फिर्यादीची बदनामी झालेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी- 1) मुलगा – आकाश महेद्र हजारे वय-29 वर्ष, 2) आई 3) बहीन 4) मुलाची मावशी 5) मोठी मावशी, 6) मामा – उदय तुपारे, वय-40 वर्षे, 7) मुलाचे- आजी-(आईची आई) रा. पंचशील नगर, बीड यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये सातारा गुरन – 591/2024 कलम 318(2), 318(4), 316 (2), 356(2), 3(5) BNS. हुंडाबंदी प्रतिबंधक कायदा – कलम 3(1) नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि देशमुख करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!