
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या इसमावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोलाजी नागरे रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ब्रिजवाडीतील जुन्या कमानीजवळच्या रिक्षा स्टँडवर बाह्यस्रोत कर्मचारी आकाश दणके यांच्यासह दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर गोंविद पाखरे (रा.ब्रिजवाडी) याने नागरे यांना शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा आणला. नागरे यांच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी पाखरेवर गुन्हा दाखल करण्यात आला.