राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सल्लागार समितीवर किशोर शितोळे यांची सदस्यपदी नियुक्ती !

औरंगाबाद, दि. ८ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त माजी सदस्य किशोर शितोळे यांची राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सल्लागार समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवरी (दि.आठ) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आम्ही तीन वर्षांसाठी सल्लागार समितीची पुर्नरचना करण्यात आली असून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत.
कुलगुरू डॉ प्रमोद येवले हे या समितीचे सदस्य असणार आहेत. युवकांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या सदस्य गटातून किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते माजी व्यवस्थापन परिषद सदस्य असून देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
तसेच ‘जलदूत’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी जलसंधारणासंदर्भात कार्य केले आहे. या नियुक्तीबद्दल किशोर शितोळे यांचे डॉ.प्रशांतकुमार वनंजे, (राज्य संपर्क अधिकारी,,रासेयों कक्ष मंत्रालय) व विद्यापीठ रासेयो संचालक डॉ आनंद देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.