महाराष्ट्र
Trending

युवा महोत्सवासाठी २९५ संघाची नोंदणी, सहभागी न होणाऱ्या १८१ महाविद्यालयांना १० हजारांचा दंड भरावा लागणार !!

-दोन हजार कलावंत सहभागी होणार

छत्रपती संभाजीनगर, दि.२० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव येत्या २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होत असून एकुण २९५ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. महोत्सवात सुमारे दोन हजार कलावंत सहभागी होणार आहेत.

युवक महोत्सवाच्या तयारीसाठी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार समिती व संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यंदाचा महोत्सव देखील विद्यापीठाच्या मुख्य परिसरात होणार आहे. गेल्या वर्षाभरात इंद्रधनुष्य महोत्सव, ’नॅक’, दीक्षांत समारंभ आदी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. यंदा संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आली. ७ ते १८ डिसेंबर या काळात महाविद्यालयांनी नोंदणी करुन हार्ड कॉपी विद्यार्थी कल्याण विभागात जमा केली. गेल्या १२ दिवसात ४७६ पैकी २९५ महाविद्यालयीन नोंदणी केली आहे. महोत्सवात २९५ महाविद्यालयांचे एकूण १ हजार ८८० कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये १ हजार १३ विद्यार्थी तर ८६७ मुलींचा सहभाग आहे. तसेच २६८ पुरुष व १६८ महिला असे ४३६ संघ व्यवस्थापक आसणार आहेत. तर महोत्सवात सहभागी न होणा-या ८१ महाविद्यालयांना प्रत्येक १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या संदर्भात कसलीही गय करण्यात येणार नाही, अशा सूचना कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी दिल्या आहेत.

सल्लागार संयोजन समिती बैठक

महोत्सवाच्या तयारीसाठी एकूण २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास १२५ प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या समित्यामध्ये असणार आहेत. सल्लागार समितीची शुक्रवारी (दि.२० ) दुपारी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते तर विविध समित्यांची बैठक शनिवारी (दि.२१ ) घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.

प्रकुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार

गेल्या १० ते १२ वर्षांपासून जे महाविद्यालय युवक महोत्सवात सहभागी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांची सत्यता पडताळणी करण्यासाठी तसेच कारण मीमांसा करण्यासाठी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!