
SANGLI – आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण परिसरात दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या भागातून वाहणारी तीळगंगा नदीला अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहू लागली होती. गेल्या आठवड्यात सांगलीत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती.
त्यानंतर आठवडाभर पावसाने उसंत घेतली होती. गुरुवारी दुपारी पुन्हा वाळवा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी रेठरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला होता.
सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेठरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; तिळगंगा नदी वाहू लागली भरून