महाराष्ट्र
Trending

पोलीस कोठडीत गळफास! 🚨मृत्यूने खळबळ 😨🔍 आरोपीचा मृत्यू की गूढ आत्महत्या? 😱🤔 CID चौकशी सुरू 🔎

NAGPUR | शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात काल रात्री एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकाळपासून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल होऊन पाहणी करत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव नागेंद्र भाटिया असून तो प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. नागेंद्र भाटियाने नागपूरमधून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप होता.

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत प्रयागराज येथून त्याला अटक करून नागपूरला आणले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी (रिमांड) मंजूर करण्यात आली होती.

मात्र, काल रात्री पोलीस ठाण्यात असतानाच आरोपी नागेंद्र भाटियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Back to top button
error: Content is protected !!