औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नावही आता बदलल, संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर ! मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात दाखल, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घोषणांचा पाऊस !!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

संभाजीनगर लाईव्ह, दि.१६ – औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नावही आता बदलन्यात आलं आहे. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील नोटीफिकेशन जारी केलं आहे. यापूर्वी केवळ शहराचं नाव बदललेलं होतं. आता संपूर्ण विभाग आणि जिल्ह्याचं छत्रपती संभाजीननगर असं नामांतर करणारी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.
औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद उपविभाग, औरंगाबाद तालुका आणि औरंगाबाद गाव या सर्वांचं नामांतर आता छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर उपविभाग, छत्रपती संभाजीनगर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर गाव असं नामांतर करणारी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. दरम्यान, नामांतराच्या फलकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावरण करण्यात आलं. आज सकाळी १०.५५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण करण्यात आलं. स्मार्ट सिटी कार्यालय. छत्रपती संभाजीनगरमध्ये या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार, दि.१६ रोजी सकाळी ०८.५० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.सकाळी ९ वा.औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम –
१) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपूजन,
२) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन,
३) हसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण.
४) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन
५) औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक,
स्थळ:- वंदे मातरम सभागृह.
सकाळी १०.४० वा.मोटारीने स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी १०.४५ वा.स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन.
सकाळी १०.५० वा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.
सकाळी १०.५५ वा.छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.
दुपारी ११.०० वा.राज्य मंत्रीमंडळ बैठक.
स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. मंत्रीमंडळ
बैठकीनंतर लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन,स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.
दुपारी ०२.०० वा.पत्रकार परिषद.स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ.
दुपारी ०३.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
दुपारी ०३.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव.
सायं. ०५.०० वा.मोटारीने गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं. ०५.१५ वा.गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.
स्थळ:- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.
सायं. ०५.३० वा.मोटारीने निराला बाजार, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं. ०५.४० वा.गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.
स्थळ:- निराला बाजार, औरंगाबाद.
सायं. ०५.५० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं.०६.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
रात्री ०८.२० वा.मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे प्रयाण.
रात्री ०८.३० वा.’गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- क्रांती चौक, औरंगाबाद.
सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार, दि. १७ रोजी सकाळी ०८ ४५. वा.मोटारीने सिध्दार्थ उद्यान, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी ०९.०० वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम.
स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,
सकाळी ०९.३० वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनीस भेट.
स्थळ :- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,
सकाळी ०९.४५ वा.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण.
स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.
सकाळी १०.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी १०.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव
दुपारी ०१.३० वा.मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी ०२.०० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने श्रीनगर, जम्मू-कश्मिरकडे प्रयाण.