महाराष्ट्र
Trending

मुलांची शैक्षणिक प्रगती व्हाट्सअप द्वारे मिळणार, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती आता पालकांच्या हाती

BULDHANA | विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम

BULDHANA | – राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत आता विद्यार्थ्यांच्या पालकांची व्हाट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित व्हावे, यासाठी पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.

निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना तात्काळ मुलांची शैक्षणिक प्रगती व्हाट्सअप द्वारे मिळणार आहे. त्यासाठी ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपवर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पालकांचे व्हाट्सअप क्रमांक नोंदवून या अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!