महाराष्ट्र
Trending

लघु उद्योजकांसाठी एसएमई भांडवल उभारणी विषयी सेमिनार !

छत्रपती संभाजीनगर- वाढत्या स्पर्धात्मक युगात लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) भांडवल उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन (मसिया) यांच्या वतीने विशेष सेमिनार आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम उद्योजकांसाठी माहितीपूर्ण ठरला.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सीएस चेतन भुताडा, सीए विघ्नेश पालकर, सीए पियुष बजाज आणि सीए रोहित जोईसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी एसएमई उद्योगांना भांडवल उभारणीची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग कसे करावे यावर  चर्चा केली.

सीएस चेतन भुताडा यांनी भांडवल उभारणीसाठी आवश्यक नियोजन आणि तांत्रिक प्रक्रियेवर भर दिला. सीए विघ्नेश पालकर यांनी लघु उद्योगांना त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य भांडवल उभारणीच्या संधी कशा शोधाव्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सीए पियुष बजाज आणि सीए रोहित जोईसर यांनी एसएमई लिस्टिंगशी संबंधित फायदे, विस्ताराच्या संधी आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

या सेमिनारमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक, व्यावसायिक आणि आर्थिक सल्लागार उपस्थित होते. लघु उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि भांडवल उभारणीच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लघु आणि मध्यम उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी भांडवलाची महत्त्वाची भूमिका आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर सेमिनार उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी लघु उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!