
CHH. SAMBHAJINAGAR | – मुकुंदवाडी परीसरात, मृत्यूचा थरार, कोयत्याने तिघांवर हल्ला करून, दोन गंभीर जख्मी तर एक जागीच ठार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. झाला असून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी, परीसरात रात्री, लहान वादाचे रूपांतर मृत्यूचा थरारात ओढल्या गेले. संपूर्ण गुन्ह्याची फिर्याद दत्ता जाधव यांनी, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिली असून, या हल्ल्यात कोयत्याने दोन गंभीर जख्मी तर एक जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ल्यात जख्मींची नावे सचिन संकपाळ, दत्ता जाधव असून, मयत नितीन संकपाळ असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलीसांनी सापळा रचत पाच आरोपी सह एक अल्पवईन आरोपी ताब्यात घेतले असून, आरोपींची नावे या प्रमाणे 1) मस्तान उर्फ नन्ना कुरेशी, 2) समिर खान, 3) बाबर शेख, 4) साजीद कुरेशी, 5) नासेर खान, यासह 16 वर्षाचा अल्पवयीन, आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. संपूर्ण घटनेचा तपास एमआयडीसी सिडको पोलीस करत असून, आज 20 जून रोजी सर्व आरोपींना, जिल्हा आणि सत्र न्यायलयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.