महाराष्ट्र
Trending
शेअर मार्केटने डोक्यावर कर्ज वाढले म्हणून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला !

JALGAON | – शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडली आहे
या हल्ल्यात वृध्द महिला ही गंभीर जखमी झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी संशयित आरोपी तेजस विलास पोतदार याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.