एमआयडीसी वाळूज: मेटलमॅन कंपनीसमोर पिकअपच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेटलमॅन बी-१७ कंपनीच्या समोर एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. भरधाव वेगातील मालवाहू पिकअप वाहनाने एका तरुणीला जोराची धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजेच्या सुमारास आरती ही तरुणी पायी जात असताना, मालवाहू पिकअप क्रमांक MH-20-CT-3762 च्या चालकाने आरतीला भीषण धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिने प्राण गमावले.
या प्रकरणी मृत तरुणीची आई द्रोपदा चंद्रकांत कावळे (रा. दत्तनगर, जांभूळवाडी, कात्रज, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पिकअप चालक आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१) (सदोष मनुष्यवध नसून हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे), २८१, १२५(ए), १२५(बी) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गु.र.नं. ८४७/२०२६). पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज हे करीत आहेत.






























