DHULE – मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी एक खाजगी प्रवासी बस अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना देवभाने परिसरात घडली. मुंबईहून इंदोरच्या दिशेने निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. टायर पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, बस पेटण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
ANC – मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी एक खाजगी प्रवासी बस अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना देवभाने परिसरात घडली. मुंबईहून इंदोरच्या दिशेने निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. टायर पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.