
DHULE | – धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) प्रमोद नगर शाखेचे ब्रांच मॅनेजरने ITI महिला प्राध्यापिकेला ‘तुम्ही मराठी असेच आहात असे हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द’ वापरल्यामुळे आज शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला यावेळी SBI बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली होती
म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत लोन ऑफिसर सदाशिव अजगे याच्या कानशिलात लगावली. यावेळी ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते.
यावेळी बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेची माफी मागितली असून SBI बँक मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली.