महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

अंगणवाडीसाठी ॲप तयार केला त्याचा फायदा देखील लाडक्या बहिणीला होणार, ग्रामपंचायत मधला कर भरण्यासाठी देखील आता क्यू आर कोड बनवला

PUNE – सगळ्यांना शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा
– जिल्हा परिषद बांधकामांच्या विभागांमध्ये काही चुकीच्या गोष्टी होतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे
– त्यामुळे यामध्ये एकच डॅशबोर्ड बनवून वेबसाईट तयार करण्यात आली आहे
– अनेकदा बिल थांबायची ते आता थांबणार नाहीत
– सेवानिवृत्तीच्या विभागात देखील असा डॅशबोर्ड तयार केलाय त्याच उद्धघाटन केलं
– ज्या दिवशी निवृत्त होणार त्याच दिवशी सर्व निधी मिळणार
– ग्रामपंचायत मधला कर भरण्यासाठी देखील आता क्यू आर कोड बनवला आहे
– पुणे मुंबई मध्ये बसून देखील गावाकडच्या घराचा कर आता भरता येणार
– जिल्हा परिषद मधल्या विविध विभागातली माहिती आता व्हाट्सअप चॅटबॉर्ड वर पाहता येणार
– अंगणवाडीसाठी देखील एक ॲप तयार केला आहे त्याचा फायदा देखील लाडक्या बहिणींना होणार
– सरकारच्या विविध योजनांचा आढावा मी आज घेतला
– गजानन पाटलांवर जबाबदारी सरकारने दिली त्यांनी पार पाडली आहे
– आपण देखील ती तपासावं वेगळं काही शोधत बसू नका जबाबदारी पार पाडली आहे का ते बघा
– दहावीचा निकाल आता लागलेला आहे
– १४-१५ लाख विद्यार्थ्यांना आता ऍडमिशन घ्यायचा आहे
– जवळपास 13 लाख मुला मुलींचे प्रवेश झाले आहेत
– ऑनलाईन केल्यामुळे कधी कधी ग्रामीण भागात अडचण येत आहेत म्हणून मंत्री दादा भुसे यांच्या सोबत माझं बोलणं झालं
– काही बाबतीत मार्ग काढावा लागेल त्याचे प्रयत्न चालू आहेत

ऑन लाडकी बहीण
– याबाबदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्टेटमेंट दिल आहे ते तुम्ही ऐकलं नाही का ?
– मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं
– कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करत आहेत
– आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत
– कुठल्याच घटकांवर अन्याय आम्ही करणार नाही सगळ्यांना नाही दिला जाईल
– अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे
– माझ मंत्र्यांना सांगणं आहे की कॅबिनेट बैठक असते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे
– तर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण नाही चुकून बोलून जातात
– जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा म्हणजे आम्हाला पण कळेल
– जर का असं केलं नाही तर चुकीच्या बातमी लागतात
– अशा बातम्यांना विषय मिळतो आणि बातम्या सुरू होतात
– पण आम्ही एकोपाने कारभार करत आहोत
– त्याच्यामध्ये कुठे भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू
– पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये नागरिकांमध्ये पत्रकारांमध्ये या ही गोष्टीला वाव देऊ नये
– संजय शिरसाट मंत्री नाही ते आमदार आहेत त्याबद्दल बोललो आहे
– कोणीही चुकीचा वागला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल बीड असुदे इतर ठिकाण असू दे कोणी चुकीच वागलं तरी कारवाई होणार तू जरी वागला तरी कारवाई होणार

ऑन महिला अत्याचार
– तुला काही वाईट वाटतं ज्यांना ज्यांना जे जे योग्य वाटतं तेथे करतात तुम्हाला बातमी दाखवायचा अधिकार आहे तुम्ही दाखवताना तसं त्यांना जे काही वाटतं ते ते बोलतात

ऑन हाके- मिटकरी
– लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलं नाही
– सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसा असल पाहिजे याचा विचार
– बोलताना प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काहीजणांमध्ये विकृती असते त्याला जास्त महत्व द्यायचं कारण नाही
– आरोपात काही तथ्य असेल तर आमच सरकार कारवाई करणार

ऑन राष्ट्रवादी वर्धापन दिन
– दोघांचा देखील वर्धापन दिन 26 वाच असणार ना
– कुठलेही वाद काढू नका

ऑन राज-उद्धव
– राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत
– इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे
– तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग आहे
– त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील
– पत्रकार मित्रांनो तुम्हाला टीआरपी वाढवायचा आहे म्हणून आम्हाला थांबवतात आणखी पुढे दांडकी घेता आणि विचारात बसतात

ऑन मिठी नदी घोटाळा आरोप
– जर काही चुकीचं घडलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल
– तपास यंत्रणा सक्षम आहेत त्या कारवाई करतील

Back to top button
error: Content is protected !!