मंडळ अधिकारी लाच घेताना जाळ्यात, सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी कॅबिनमध्येच घेतले 15 हजार !

पालघर, महाराष्ट्र दि. 22 – मंडळ अधिकारी लाच घेताना अलगद जाळ्यात अडकला. सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी कॅबिनमध्येच 15 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई ठाणे विभागाने मोठ्या शिताफिने पार पाडली.
सुरेंद्र काशिनाथ संखे (मंडळ अधिकारी (वर्ग-३), कंचाड, मंडळ अधिकारी कार्यालय, ता.वाडा जि. पालघर) असे आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तकारदार यांनी खानिवली गाव ता. वाडा येथे सर्व्हे नं. १०५ मधील १ डेक्टर ३३ आर ही जमीन खरेदी केली. त्याबाबत फेरफार नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी सुरेंद्र काशिनाथ संखे (वय ५७, कंचाड, ता. वाडा, जि. पालघर) यांनी ३०,००० /- रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली.
या आशयाच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २१ / ११ / २०२२ रोजी मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे यांची तक्रारदार यांनी कार्यालय कचड येथे समक्ष भेट घेतली. मंडळ अधिकारी संखे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २५०००/- रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.
त्याअनुषंगाने लागलीच दि. २१/११/२०२२ रोजी कंचाड, मंडळ अधिकारी कार्यालय येथे सापळा लावला. सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम देण्याकरीता समक्ष भेटले. मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे यांनी त्यांच्या कॅबीनमधे १५०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असताना १५.५५ वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई वाडा पोलीस स्टेशन येथे सुरु आहे.
सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.