महाराष्ट्र
Trending

केडीएमसीचा औषध घोटाळा!

चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल - डॉ. दीपा शुक्ला

KALYAN | – कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर केडीएमसीची लाखो रुपयांची औषधे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला आहे.

एकीकडे केडीएमसीची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना, लाखो रुपयांचा औषधांचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर आढळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा साठा डम्पिंग ग्राउंडवर कसा आला आणि कोणी आणला? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Back to top button
error: Content is protected !!