महाराष्ट्र
Trending

”काळाने घाला घातला” एकाच घरातील मायलेकी व पुतणी तिघींचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू

NANDED | – नांदेडच्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह एका पुतणीचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. मागासवर्गीय वस्तीवर राहणाऱ्या महानंदा भगवान हणमंते वय 35 वर्ष, पायल भगवान हणमंते वय 13 वर्ष व ऐश्वर्या मालू हणमंते वय 13 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून वस्तीवरील बोरची मोटर जळाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वस्तीवर पण नसल्याने ह्या तिघीजणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. मात्र नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही दुर्दैवाने या तिघीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!