बिडकीन हद्दीत चाकू, गुप्ती व लाकडी दांड्यासह स्कॉर्पियो, स्विफ्ट कारला पकडले ! बन्नीतांडा, कचनेर व बालानगरच्या तिघांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० – गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बिडकीन हद्दीत चाकू, गुप्ती व लाकडी दांड्यासह स्कॉर्पियो, स्विफ्ट कारसह तिघांना पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक प्रल्हादराव माने (पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन बिडकीन) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 29/12/2024 रोजी 18.00 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीत सपोनि यांच्या आदेशाने शासकीय वाहनाने पोलिस पथक रवाना झाले. पोलिस पथक बिडकीन बसस्टँड येथे आसताना गोपनिय बातमी दाराकडून माहिती मिळाली की, शेकटा फाट्याकडून दोन वाहने एक काळ्या रंगाची स्कार्पिओ व एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर ज्यामध्ये चाकू व गुप्ती तसेच लाकडी दांडे आहेत अशी माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच पोलिस पथक पंचासोबत शेकटा फाटा येथे पोहोचले आसता समोरुन येणाऱ्या एक काळ्या रंगाची स्कार्पिओ क्र. MH-20-GY-2971 एक पाढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्र. MH-47-Q-1570 यांना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडीमधील व्यक्तींना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरुन रतन चव्हान (वय 22 वर्षे रा. बन्नीतांडा ता. पैठण) असे सांगितले. तसेच स्विफ्ट कार गाडीमध्ये दोन जण बसलेले होते त्यांना त्यांचे नाव गाव विचारले आसता त्यानी त्यांची नाव 1) तुषार दिलीप राठोड (वय 21 वर्ष रा. कचनेर तांडा क्र. 1 ता.जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. न्यायनगर गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर) 2) पवन गोरख गोरडे (वय 24 वर्ष रा. बालानगर ता. पैठण ह.मु. एन-4 हनुमान नगर सिडको छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. सदर दोन्ही गाडीची झडती घेतली.
काळ्या रंगाच्या स्कॉर्पीयोमध्ये चाकू व दांडा मिळून आला. तर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गुप्ती व लाकडी दांडा मिळून आला. दोन्ही गाड्या व तिघांना घेवून पोलिस स्टेशनला आले. अरुन रतन चव्हान (वय 22 वर्षे रा. बन्नीतांडा ता. पैठण), तुषार दिलीप राठोड (वय 21 वर्ष रा. कचनेर तांडा क्र. 1 ता.जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. न्यायनगर गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर),) पवन गोरख गोरडे (वय 24 वर्ष रा. बालानगर ता. पैठण ह.मु. एन-4 हनुमान नगर सिडको छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर बिडकीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.