
PANDHARPUR |- आषाढी वारीमध्ये यंदा एआयचा वापर करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानातून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी भक्तांची हेड काउंट मोजणी, फेस रीडिंग ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून केली जाणार आहे. शिवाय वारीच्या गर्दी काळात चेंगरा चेंगरीचे नियोजन सुलभ व्हावें यासाठी एआय मदत करणार आहे. त्यामुळे 15 लाखाहून अधिकची गर्दी होणाऱ्या पंढरीच्या वारीचे नियोजन आता सुलभ होत आहे.
परिणामी यंदा सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूरची AI वारी होत आहे. सोलापूरचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून AI वापर होतो आहे.