कबीरमठ, हर्सूलजवळ मोटारसायकल चोरटा जेरबंद, फुलंब्रीच्या युवकाची चोरीची मोटारसायकल हस्तगत !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ – कबीरमठ, हर्सूलजवळ मोटार सायकल चोरटा हर्सूल पोलिसांनी जेरबंद केला. त्याच्या ताब्यातून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. माहादु लालमन राठोड (वय १९ वर्ष, रा. हर्सूल कचरा डेपो सांवगी तलावाच्या बाजुला, ता.जि छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस ठाणे हर्सल येथे दिनांक ०२/०१/२०२५ रोजी फिर्यादी गणेश तुळशिराम डिंडोरे (वय २८ वर्ष रा. धामणगाव ता. फलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असून नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पो. स्टेचे डी. बी. पथकास गुप्त बातमीदारामार्फतीने माहीती मिळाली की, नमुद गुन्हयात चोरी गेलेला मुद्येमालासह आरोपी हा जमनजोती रोड कबीरमठ हर्सूल छत्रपती संभाजीनगर भागात आहे.
या मिळलेल्या माहीतीप्रमाणे पोलिस निरीक्षक डॉ. सुनिता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाचे चक्र फिरवून पो.स्टे.चे विशेष शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक गणेश केदार, पोह पालवे, पोअं फिरोज तडवी, पोअं आकाश जायभाये हे रवाना झाले. संशयित आरोपी १) माहादु लालमन राठोड (वय १९ वर्ष, रा. हर्सूल कचरा डेपो सांवगी तलावाच्या बाजुला, ता.जि छत्रपती संभाजीनगर) यास शिताफिने ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेवून त्याच्या ताब्यातील मिळालेल्या मोटारसायकल डिलक्स व इतर 2 मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने सदर मोटारसायकल हर्सूल टी भागातून तसेच इतर ठिकाणाहून चोरी केल्या व कबीरमठ याठिकाणी लपवून ठेवण्यासाठी आलो आहे असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पो. स्टेचे अभिलेख तपासले असता सदर मोटारसायकल बाबत पो.स्टे हसुूल येथे मो.सा चोरीचा वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीचे ताब्यातून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्येमालासह एकूण ०४ मोटार सायकल असा एकूण-२,२०,०००/-किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करुन सुमारे ७ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप-आयुक्त नितोन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. सुनिता मिसाळ, विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार, मपोह निर्मला कोलते, पोह अनिल पालवे, पोअं फिरोज तडवी, पोअं आकाश जायभाये, पोअं श्रावण गुंजाळ यांनी केली.