महाराष्ट्र
Trending

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्या कराडचं बिर्हाड जेलमध्ये टाका ! बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चातील सूर !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २८ – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हायचा असेल तर मंत्री धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळातून बाहेर काढा व संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला व फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशा मागणीचा सूर आज सर्वपक्षीय मूक मोर्चातून निघाला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय लाखोंचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरु झाला अन् जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. 

मंचावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश सोळंके आदी उपस्थित होते. या सर्वांनी वाल्मीक कराड व आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा कसला वाल्मिक हा तर वाल्या. आपल्याला गुन्हेगारी विचाराला ठेचायचं आहे. कुठलीही हिंसा आपलाल्या करायची नाही. लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन सुरुच राहणार आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही.

आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदच भाड्यानं दिलं असा गंभीर आरोप केला. आमदार सुरेश धस यांनीही वाल्या कराडवर जोरदार हल्ला चढवला. परळीची गुन्हेगारी, वाळूचे हायवा, परळी थर्मलची राख व अधिकार्यांना पिस्तुलाच्या जोरावर कोण धमकावतंय हे सर्वानाच माहिती आहे. अशा या आका बाकाला अटक होईपर्यंत मी शांत बसणार नाही अशी गर्जनाही धस यांनी यावेळी केली. संभाजीराजे छत्रपती यांनीही कडाडून हल्ला चढवला व म्हणाले की, अगदी सुरुवातीपासून माझी ही भूमीका आहे की, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळापासू दूर ठेवा. कारण या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. कारण धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे आश्रयदाते आहेत. एकूणज मोर्चाच्या सांगताप्रसंगी लाखोंच्या जनसमूदायही मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिमडळातून काढून टाका, वाल्मिक कराडला अटक करा फरार आरोपींना बेड्या ठोका अशा मागणींचा सूर होता.

Back to top button
error: Content is protected !!