महाराष्ट्र
Trending
साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’
‘गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा चित्रपट - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 5 : साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा चित्रपट आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यावतीने मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन सोमवारी संध्याकाळी नरीमन पॉईंट आयनॉक्स सिनेमागृहात करण्यात आले होते.
यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी सायली संजीव, अभिनेता सुब्रत जोशी, दिग्दर्शक शंतनु रोडे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, सुनील बोधनकर आदी उपस्थित होते.