महाराष्ट्र
Trending

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

DHULE | – अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साक्री तालुक्यातील रायपूर गावानजिकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. त्याला ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. काकाला अटक करण्यात आली. साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसाच्या तपासात पीडितेचा चुलत काकाने अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यामुळे संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाला होता. चुलत काकाचा शोध निजामपूर पोलिसांकडून सुरु असतानाच तो साक्री तालुक्यातील रायपूर जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेवून निजामपूर पोलीस ठाण्यात आणले. पोलीसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी चुलत काकाला अटक करण्यात आलेली आहे. घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करीत आहेत.

 

 

Back to top button
error: Content is protected !!