महाराष्ट्र
Trending

सिग्नल, चौकात प्रवाशांना पैसे मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या ! पुढील 60 दिवसांसाठी मनाई आदेश !!

छत्रपती संभाजीनगर- सिग्नल, चौकात, भररत्यात प्रवाशांना पैसे मागणार्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पैस मागणार्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. हा आदेश पुढील 60 दिवसांसाठी लागू राहणार आहे.

पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात स्थानिक, बाहेरील व्यक्ती लहान मुलांना सोबत घेवून तसेच विशेष करून तृतीयपंथी हे रस्त्यावर, चौकाचौकात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून येणा-या जाणा-या प्रवाशांना नागरिकांना त्रास देत आहेत आणि त्यांना पैसे देण्यास भाग पाडत आहेत.

अशा प्रकारच्या उपद्रव किंवा मोठ्या प्रमाणावर जनतेला धोका निर्माण होण्यापासून रोखण्याच्या दृष्टीकोणातुन 163 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात काही गट (भीक मागणारे) आणि विशेष करुन तृतीयपंथी यांना एकट्याने किंवा एकत्रितपणे या द्वारे शहरात फिरण्यास आणि निवासस्थान/ आस्थापने / सार्वजनिक ईत्यादी ठिकाणी भेट देण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा सदस्यांना घरांच्या/ आस्थापनांच्या मालकांनी आमंत्रित न करता. ( जेथे कुटुंबातील जन्म / मृत्यु /उत्सव/ लग्न ईत्यादी कार्यक्रम आहे) भेट देण्यास मनाई करण्यात येत आहे.

त्यांना ट्रॅफिक जंक्शन / चौकात रस्त्यावर एकट्याने किंवा त्यांच्या समुहाने एकत्र येण्यास आणि वाहनचालक/ प्रवाशांकडून पैसे वगैरे मागण्यासही मनाई करण्यात येत आहे. सदर प्रतिबंध करण्याचे आदेश पुढील 60 दिवसांसाठी म्हणजे 10/12/2024 ते 9/02/2025 पर्यंत देत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 223 अन्वये दंडनीय असेल, अशी माहिती, अविनाश अघाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा छञपती संभाजीनगर यांनी दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!