लोखंडी रॉडने डोक्यात मारून पत्नीला ठार मारले ! फुलंब्री तालुक्यातील बोधेगावच्या युवकावर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर- चक्राकार दात्र्ये असलेल्या लोखंडी रॉडने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन पत्नीला जिवे ठार मारुन पती पळून गेला असल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली असून त्यानुसार फुलंब्री तालुक्यातील बोधेगावच्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल उत्तम वाघ (वय – 28, व्यवसाय – मजुरी रा.बोधेगांव ता.फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात मृत महिलेचे वडील राधाकिसन आसाराम गरबडे (रा. बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) यांनी सातारा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार यातील मृत भारती विठ्ठल वाघ ही यातील फिर्यादी राधाकिसन आसाराम गरबडे यांची मुलगी आहे. यातील आरोपी विठ्ठल उत्तम वाघ हा तिचा पती आहे यातील आरोपी विठ्ठल हा पत्नी भारतीस नेहमी त्रास देत होता यातील फिर्यादी यांना माहिती मिळाल्यानंतर दि. 08/12/2024 रोजी भारती हिस सासरहुन माहेरी आणले होते. दि. 16/12/2024 रोजी 12.30 ते 13.00 वाजेच्या दरम्यान भारती ही बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर येथे माहेरी घरात एकटी असताना यातील आरोपीने घरी येवुन भारतीस समोर चक्राकार दात्र्ये असलेले लोखंडी रॉड ने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारुन पळुन गेला या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.