तुम्हारा नेता कहा है ? तू किसका बीजेपी कार्यकर्ता है असे म्हणून डोक्यात फायटर मारले ! अंबडच्या क्रांती हॉटेलमध्ये राडा, चौघांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर- तुम्हारा नेता कहा है ? तू किसका बीजेपी कार्यकर्ता है असे म्हणून डोक्यात फायटर मारले. जालना जिल्ह्यातील अंबडच्या क्रांती हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेख विखार उर्फ लाला शेख मुक्तार (वय 35 वर्षे व्यवसाय – किराणा दुकाण रा. नाईकवाडी मोहल्ला अंबड ता. अंबड जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार दि.19/12/2024 रोजी 10.26 वाजेच्या सुमारास शेख विखार उर्फ लाला हे क्रांती हॉटेल समोर येथे गुलाब जामून घेण्यासाठी जात असतांना तेथे 1) इम्रान, 2) असलम, 3) असिम (ए.जे. ग्रुप) (सर्व रा. पठाण मोहल्ला अंबड) हे आले. त्यांनी शेख विखार उर्फ लाला यांना शिवीगाळ केली व म्हणाले की, तुम्हारा नेता कहा है तुम कहाका बीजेपी कार्यकर्ता है असे म्हणत असतांना शेख विखार उर्फ लाला यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेल्याने ते क्रांती हॉटेल मध्ये गेले.
तेंव्हा असलम याने शेख विखार उर्फ लाला यांच्या डोक्यात फायटर मारले व इम्रान व असिम यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तेथे एक अनोळखी लाकडाची काठी घेवून आला तेंव्हा हॉटेल मालक यांनी त्यांना समजावून हॉटेलच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी शेख विखार उर्फ लाला यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शेख विखार उर्फ लाला शेख मुक्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) इम्रान, 2) असलम, 3) असिम यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.