शेतकरी कृती समीती गंगापूरच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल ! राहुल ढोले, योगेश शेळके, भरत काळकेंसह 12 ते 13 जणांवर एफआयआर !!

छत्रपती संभाजीनगर – शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्तारोको करणार्या शेतकरी कृती समीती गंगापूरच्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी १२.१५ वाजेच्या सुमारास इसारवाडी फाटा अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आंदोलन करण्यात आले होते.
पांडुरंग काकासाहेब शेळके (वय-३७ वर्षे व्यवसाय-नोकरी पोलीस ठाणे वाळुज, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, नमुद ता. वेळी ठिकाणी यातील आरोपीतांनी शेतकरी कृती समीती गंगापूरचे राहुल ढोले यांच्या नेतृत्वाखाली इसारवाडी फाटा अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवर लोकांना जमवून तसेच पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्तारोको आंदोलन केले. रस्त्यावरून येणारे-जाणारे वाहन अडवली. रोडवरील जाणारे येणारे वाहनात/परिसरात दहशत निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी राहुल ढोले, योगेश शेळके, भरत काळके, जनार्धन निकम, प्रशांत इंगळे यांच्यासह इतर 12 ते 13 जणांवर वाळूज पोलिस स्टेशनमध्ये कलम 362/2024 कलम 126(2),189 (2) बी.एन.एस. सह कलम135 म.पो.कायदा सह कलम 07 सीआरपीसी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.