महाराष्ट्र
Trending

सिल्लोडच्या युवकासह तब्बल 92 बेरोजगारांची फसवणूक, व्हाट्सअपवर आर्मी भरतीची जाहिरात देवून सांस्कृतिक क्रीडा मंडळावर भरदिवसा गंडवले !

सोलापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – सिल्लोडच्या युवकासह तब्बल 92 बेरोजगारांची फसवणूक करण्यात आली. व्हाट्सअपवर आर्मी भरतीची जाहिरात देवून सांस्कृतिक क्रीडा मंडळावर बोलावले. त्यानंतर नियुक्ती शुल्क 3000/- रुपये व गणवेश शुल्क 3000/- प्रत्येक बेरोजगार युवकाकडून वसूल करण्यात येवून त्यांची फसवणूक केली. भरती प्रक्रिया राबवणारे हे आर्मीच्या पोशाखात होते असे बेरोजगार युवकांनी फिर्यादीत नमूद केले असून सोलापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात निखील निंबा बागुल (वय 21 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. जयभवानीनगर, सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) याने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, दिनांक 11/12/2024 रोजी व्हॉटसअॅप वर MAHARASHTRA COMMANDO FORCE (MCF) भरती असल्याची जाहीरात एका ग्रुपवर आली होती. सदरची भरती ही ऑफलाईन आहे. भरतीची तारीख, वेळ, ठिकाण आणि पद संख्या जाहिराती मध्ये दिलेले असल्याचे सांगितले. त्यावरुन दिनांक 17/12/2024 रोजी सकाळी 06.30 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मैदान खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथे मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले. त्यावरुन फिर्यादी निखील बागुल व त्याचे काही मित्र दिनांक 17/12/2024 रोजी 06.30 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मैदान खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर तेथे पोहोचले. सदर ठिकाणी त्यांना एका रांगेमध्ये उभे करून सांगितले की, सदची भरती ही कंत्राटी स्वरुपाची असून, 11 महिन्याचे अँग्रीमेंट केले जाईल, तसेच प्रती महिना 12000/- रुपये वेतन दिले जाईल.

त्यासाठी तुम्ही जेंव्हा मैदाणी चाचणी मध्ये पात्र होणार तेंव्हा तुम्हाला मेडीकल फिटनेस सरकारी दवाखान्याचे व पोलिस चरीत्र पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागेल व दिनांक 25/12/2024 रोजी याच मैदानावर यावे लागेल. व नियुक्ती शुल्क 3000/- रुपये व गणवेश शुल्क 3000/- रुपये असे पहिले द्यावे लागेल. त्यानंतर तुमची सातारा येथे 15 दिवसांचे प्रशिक्षण होईल. सदर प्रशिक्षणाचा खर्च कंपनीकडून तुम्हाला मिळेल व येण्या जाण्याचा खर्च 1000/- रुपये तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर सर्व मुलांच्या शैक्षणीक कागदपत्रांची छायांकित प्रती घेतल्या. त्यानंतर 1200 मीटर धावणे ज्यास 25 गुण व गोळा फेक ज्यास 25 गुण अशी मैदानी चाचणी होती. सदर मैदानी चाचणी मध्ये फिर्यादी निखील बागुल यास 1200 मीटर धावणे यात 25 व गोळा फेक मध्ये 15 असे मैदानी चाचणीमध्ये 40 गुण मिळाले.

त्यानंतर फिर्यादी निखील बागुल यास कॉल आला की आपण मैदाणी चाचणी मध्ये पास झाला असून, आपली MCF मध्ये निवड झाली असून, आपण दिनांक 25/12/2024 रोजी आम्ही दुपारी 01.00 वाजता सांगितल्याप्रमाणे 6,000/- रुपये घेऊन या, त्यावरून फिर्यादी निखील बागुल हे सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मैदान खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथे आलो. सदर ठिकाणी अंदाजे 100 मुले होती. त्यांची देखील निवड झालेली होती. त्यावरून फिर्यादी निखील बागुल व त्याचा लहान भाऊ 6,000/- रुपये पाठविले. फिर्यादी निखील बागुलसोबत अन्य 92 मुलांनी वरील संस्थेस प्रत्येकी 6,000/- रुपये रोख तसेच ऑन लाईन पाठविलेले आहे.

त्यानंतर काही मुलांना अशी शंका आली की, सदर भरती घेण्यासाठी वरील संस्थेने कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतलेली नाही. तसेच त्यांची संस्था ही नोंदणीकृत आहे किंवा नाही तसेच त्यांना अशा प्रकारची भरती घेण्याचा अधिकार नाही. त्यावरुन काही मुले हे पोलिस ठाणे सिटीचौक येथे पोहोचले व सदरची आर्मीच्या पोशाखामध्ये भरती घेणारे 1) विशाल मोहन देवळी, वय 27 वर्षे व्यवसाय खाजगी सुरक्षा रा. मु.पो. तावशी ता. पंढरपुर जि. सोलापूर 2) विकास बापु माने वय 27 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. मु.पो. चळे ता. पंढरपुर जि. सोलापूर 3) सनी लाला बागाव वय 27 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी म.कुपो. उपरी ता. पंढरपूर जि. सोलापूर हे देखील पोलिस स्टेशनला आले. त्यांनी आर्मीच्या पोशाखामध्ये बेकायदेशीर व विनापरवागी भरती घेऊन त्यांचे आर्थिक फाय‌द्यासाठी स्वतःचे खात्यावर तसेच रोख स्वरुपात युवकांकडून रक्कम स्वीकारून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या फिर्यादीवरून विशाल मोहन देवळी, विकास बापू माने व सनी लाला बागाव यांच्यावर सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!