महाराष्ट्र
Trending

पंचायत समिती कर्मचाऱ्याचे अडीच लाख लांबवले, बसमध्ये तासभर झोप लागली अन् चोरट्याने डाव साधला ?

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ – चिखली ते धूत हॉस्पिटल (छत्रपती संभाजीनगर) दरम्यान बसमधून चोरट्याने अडीच लाख रुपये लंपास केले. फिर्यादीस बसमध्ये १ तास झोप लागली होती त्या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.

वैभव भागीनाथ राऊत (वय 54 वर्षे धंदा नोकरी (पंचायत समिती) रा. उत्तरानगरी व्यंकटेश विश्व बिल्डींग फ्लॅट न. 10 MIDC चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, ते पंचायत समिती मलकापुर जि. बुलढाणा येथे नोकरीस आहे. नोकरी मुळे रुम करून मलकापुर येथे राहतात व सुट्टीच्या दिवशी उत्तरानगरी येथे घरी येत असतात.

दि. 27/12/2024 रोजी दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी राऊत हे बॅगमध्ये अडीच लाख रुपये ठेवून निघाले. छत्रपती संभाजीनगर येथे जाणे असल्याने ते दुपारी 02.40 वाजेच्या सुमारास चिखली बसस्थानक येथून यवतमाळ ते छत्रपती संभाजीनगर जाणा-या बसमध्ये बसले. बसमध्ये बसल्यानंतर फिर्यादी राऊत यांना 1 तास झोप लागली होती. त्यानंतर सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास बस धुत हॉस्पिटलसमोर आल्याने तेथे उतरायचे होते म्हणुन बॅग घेवून ते धुत हॉस्पिटल समोर उत्तरले. बसच्या खाली उतरले असता पैसे चेक करण्यासाठी बॅग उघडली व त्यातील पैसे मिळून आले नाही. 2,50,000/- रु रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तरी दि. 27/12/2024 रोजी दुपारी 02.40 वा. ते सांयकाळी 05.30 वाजेच्या सुमारास चिखली ते धुत हॉस्पिटल समोर छत्रपती संभाजीनगर दरम्यान बसमधुन माझे नमुद वर्णानाचे 2,50,000/- रुपये काळ्या रंगाच्या बॅगमधील गुलाबी रंगाच्या पिशवीतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरा‌द्याने चोरुन घेतले आहे तरी त्याचेविरुध्द माझी कायदेशीर तक्रार आहे. माझी वरिल फिर्याद माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलिखीत केली असून ती मी वाचुन पाहीली बरोबर व खरी आहे. म्हणुन DO सपोनि/गिरी यांनी गुन्हा दाखल करुन पुढिल कारवाई कामी मा. पोनिसो यांच्या आदेशाने पोउपनि/मुंढे यांच्याकडे दिली.

Back to top button
error: Content is protected !!