महाराष्ट्र
Trending

गुंठेवारीसाठी मोठी बातमी : गुंठेवारी नियमितीकरणासाठी 50 टक्के बेटरमेंट चार्जेस 31 मार्च 2025 पर्यंत भरता येणार !

छत्रपती संभाजीनगर, दि.३१ -: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत वसाहतीमधील मिळकत धारकांसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ (सुधारणा) २०२१ नुसार गुंठेवारी नियमिती करणासाठी २००.००चौ.मी. क्षेत्रा पर्यंतच्या निवासी वापराच्या मिळकती साठी फक्त विकास आकार (Betterment Charges) ५०% सवलत देणे बाबत ठराव क्र. १५८५/२०२४ दिनांक १३/०९/२०२४ नुसार पारित करण्यात आलेला आहे.

ही सवलत दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत देण्यात आलेली होती. सदर सवलत दिनांक ३१/१२/२०२४ रोजी संपुष्टात येत आहे. या संदर्भात मिळकत धारकाचा वाढता प्रतिसाद पाहता, मिळकत धारकांना नियमीतीकरणाचे प्रस्ताव दाखल करणेसाठी प्रोस्ताहित करणेच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार २००.०० चौ. मी. पर्यंतच्या क्षेत्राच्या निवासी वापराच्या भूखंडासाठी विकास आकारामध्ये (Beterment Charges) देण्यात आलेली ५०% सवलत ही दि. ३१/०३/२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

गुंठेवारी वसाहतीमधील मिळकत धारकांनी आपल्या भूखंडाचे / भूखंडा सहीत बांधकामाचे प्रस्ताव दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावेत. जे मिळकत धारक नियमीती करणासाठी आपले प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा मिळकत धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६० अन्वये अनाधिकृत बांधकाम निष्काषीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

Back to top button
error: Content is protected !!