धनंजय मुंडेंच्या सातपुडा सरकारी बंगल्यावर 3 कोटींची डील ! पुण्याच्या जनआक्रोश मोर्चात आ. सुरेश धस यांच्या गंभीर आरोपाने राजकीय भूकंप !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ – धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर अवादा कंपनीचे अलताफ तांबोळी, शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक कराड आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील ३ कोटींना फायनल झाली, असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्या या प्रमुख मागणीसाठी पुण्यात काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय सर्व समाजाच्या मोर्चा प्रसंगी आमदार सुरेश धस बोलत होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचे धागेदोरे उलगडताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले ज्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, संतोशचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासू सुरु झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या. या नितीन बिक्कडने काय केलं, स्वताहाच्याच पायाला गोळी मारून घेतली. आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रमाईज केलं. हे सिद्ध झालं स्वतहाच्या हातानं गोळी मारून घेतली म्हणून पण तरही कंपनीवाले म्हटले थोडं फार मिटवून टाका… कंपनीवाल्याकडून पैशे घ्या… तर हे कॉम्प्रमाईज केलं काही रक्कम घेतली.
साथ मिलके काम करेंगे. किसका भी बाजा बजायेंगे, किसको भी जेल मे डालेंगे, कुछ भी करेंगे- आणि तिथून पुढं हा नितीन बिक्कड धाराशिव, बीड या जिल्ह्यांत याचा वावर वाढत गेला. कंपनीच्या सेक्युरेटीची कामं घ्यायला लागला. कंपनीच्या सेक्युरेटीची कामं घेता घेता याची हळूच वाल्मिक कराडसोबत भेट झाली. या आकाची भेट झाली. आकाची आणि यांची मीटिंग झाली. मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं की वाल्मिक कराड आणि हम साथ मिलके काम करेंगे. किसका भी बाजा बजायेंगे, किसको भी जेल मे डालेंगे, कुछ भी करेंगे. १४ जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली.
ही बाब वाल्मिक कराडला खटकली अन् वाल्मिक कराड यांची सटकली – १४ जूनला आका वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. आ. धस म्हणाले, राज्याचे मंत्री आहेत ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. तिथे एक बैठक झाली. अवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेवून परळीला गेला. वाल्मिक कराड. त्याचवेळेस कंपनीचे काही लोक धनंजय मुंड यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब वाल्मिक कराडला खटकली. सटकली… आता माझी सटकली. वाल्मिक कराड यांची सटकली. वाल्मिक कराड मुंडे यांच्या पीएला काय म्हणायचा ते म्हणाला.
धनंजय मुंडे यांच्या सरकारी सातपुडा या बंगल्यावर डील- मग नंतर असं ठरलं त्याचवेळेस अनंत कळळकुटे यांचे सबस्टेशन. ही दुसरी कंपनी आहे बरं का. त्या कंपनीच नाव आहे आय एनर्जी. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग अवादा जी कंपनी मस्साजोगला आहे संतोष देशमुख यांच्या गावी. अवादा कंपनी आली. अवादा आणि आय एनर्जी यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक ठरली दि. १९ जून २००४ ( आ. धस म्हणाले, यांचे मोबाईल लोकेशन तिथे दिसणार आहे) मी नावं सांगतो त्या अधिकार्यांची. कुणा कुणाची बैठक कुठं झाली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर अवादा कंपनीचे अलताफ तांबोळी, शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक कराड आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील ३ कोटींना फायनल झाली. आका क्या बोले, ३ करोड लाके दो. क्या होना ३ करोड होना. असं हे म्हणाले. तर अलताफ तांबोळी आणि शुक्ला हे दोन लोक कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणाले ३ करोड रुपये आपल्याला परवडत नाही. २ करोडमध्ये फायनल करा. पुन्हा ते आत गेले. म्हणाले साहाब, तिरी नही जमती दुर्री… असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना आत्ताच नाही ठरवू पुढं ठरवू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काही तरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी ५० लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहेत. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही. परंतू ५० लक्ष घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सेक्युरेटी एजन्सी आहे. हे मस्साजोग संतोष देशमुख यांचं गाव आहे. या सरपंचाच्या मस्साजोगच्या गावची सेक्युरेटी एजन्सी कोणाला दिली, कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो कोण नितीन बिक्कड. यावेळेस मात्र कळकुटे बंगल्यावर आलेला नाही, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.