महाराष्ट्र
Trending

अनैतिक संबंध असल्याने मारहाण, अनोळखीचा खून करून फरार झालेला आरोपी अटक

JALGAON – पंचायत समितीच्या अल्फाबचत भवन परिसरात रात्री अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड व काठीने मारहाण करून इसमाला जीवे ठार मारल्याची घटना घडली. या घडनेनंतर आरोपी फरार झाला. सदर घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शहरात ठिकठिकाणी शोध घेतला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस आरोपी आढळून आला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने झालेल्या घटनेबद्दल कबुली दिली. आरोपीसोबत असणाऱ्या महिलेचे त्या अनोळखी इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने मारहाण केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

– अण्णासाहेब घोलप, पोलीस उपविभागीय अधिकारी

Back to top button
error: Content is protected !!