महाराष्ट्र
Trending

वाळू माफियांवर लगाम कसणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

SOLAPUR  वाळू माफिया
– वाळू माफिया रोखण्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही आणला आहे
– अनेकजनांचे मंत्र्यांशी वगैरे संबंध असतात, वाळू संदर्भात काही जण तर अधिकाऱ्यांना माझं देखील नावं सांगतात
– पण माझा फोन जरी आला, तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा, अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत
– पुढच्या 3 वर्षात वाळू माफिया आणि वाळू संदर्भातले सर्व महत्वाचे प्रश्न संपलेले असतील

भूमिअभिलेख आंदोलन
– भूमी अभिलेख खात्यातील लोकांना सूचना दिल्यात तातडीने रुजू व्हावे
– त्यांनी शासनाला कोणताही सूचना न देता संपवार गेले आहेत
– त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, त्यांनी ड्युटीवर येऊन सांगावे
– लोकांना वेठीस धरणे हे शासन मान्य करणार नाही
– आम्ही त्यांची कोणतीही मागणी अशी पूर्ण करणार नाही, त्यांना पगार देखील दिला जाणार नाही
– अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट न सांगता जरं आंदोलन आणि युनियनबाजी करणार असतील, तर हे मान्य नाही
– तुमचा कुठलाही प्रश्न असेल, तर सरकारपुढे मांडा. मंगळवारी येऊन मला भेटा, पण यापद्धतीने वेठीस धरणे योग्य नाही
– सरकार तुमचा प्रश्न सोडवायला तयार आहे, कोतवाल पासून तलाठी पर्यंत सर्वांना न्याय दिला पाहिजे

उजनी वाळू
– उजनी धरणात खोलीकरण करून, त्यातून निघणारी वाळू सरकारी कामना देण्याचा चर्चा झाली

जळगाव प्रसूती
– आबिटकर साहेब हे सक्षम आहेत. या संदर्भात ते योग्य ते कारवाई करत निर्णय घेतील

शरद पवार कौतुक आणि संजय राऊत
– विरोधी पक्षात कामं करणाऱ्या चांगल्या लोकांचं देखील कौतुक केलं पाहिजे हे संस्कार आहेत
– शरद पवार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रमध्ये घालवल, त्यामध्ये चांगलं कामं केलं आहे
– संजय राऊत संस्कृती आणि संस्कार विसरलेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार

लाडकी बहीण आदिवासी निधी
– अत्यंत फेक बातमी आहे. बातमीत तथ्य नाही.
– काहीतरी व्हॉट्सवर सरकार बद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी चालू आहे. आदिवासी समाज आणि मागासवर्गीय समाज कुठलेही सरकार कधीही या पैशाला हात लावत नाही हा रिझर्व पैसा आहे.
– आदिवासी विभागाची जी टक्केवारी एकदा मंजूर झाली, ती कोणालाही काढण्याची हिम्मत नाही.
– लाडक्या बहिण योजनेच बजेट हे वेगळ आहे, ते महिला व बालकल्याणकडे आहे.
– समाजकल्याणचे पैसे आणि आदिवासी विभागाचे पैसे दुसरीकडे वळवण्यात येत नाही
– त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केली गेलेली. जाणीवपूर्वक बातमी जी व्हॉट्सॲप फिरत आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणूक
– निवडणूक घेण्याचा अधिकार हे आयोगाला आहे
– आयोग जेव्हा निवडणूक घेईल, तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे
– भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत

राहुल गांधी
– राहुल गांधी किती वेडे झालेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे
– ऑपरेशन सिंदूर सारख्या गोष्टीवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात
– महाराष्ट्रमध्ये सावरकर यांचा अपमान त्यांनी केला, त्यावेळी कोर्टाने फटकारलं
– ते वेडे झालेत, त्यामुळे त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका

स्थानिक स्वराज्य संस्था महायुती
– महायुतीमध्येचं निवडणुका होतील, पण ज्याठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ
– महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असं काही याचा अर्थ नाही

लोकसभा पराभव विश्लेषण
– भाजप निवडणुकीत आम्ही जिंकतो त्यातून काही शिकतो
– लोकसभेत काही जागावर आम्ही शिकलो, आणि चार महिन्यात आम्ही विधानसभा निवडणुकीत जिंकलो
– जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही राज्यचे जनतेच्या कामाला लागलो आहे

फडणवीस अजित पवार शिंदे संवाद
– या सोलापूरच्या विकासासाठी जास्तीत जास्त विचारलं पाहिजे
– अशा प्रश्नामुळे महायुतीमध्ये कोणताही दगड पडणार नाही, याची काळजी तुम्ही (माध्यम) घ्या, आम्ही देखील घेतो

Back to top button
error: Content is protected !!